JIO ची खास HAPPY NEW YEAR OFFER,399 च्या रिचार्जवर मिळणार पूर्ण कॅशबॅक
Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

JIO HAPPY NEW YEAR OFFER: 2019 अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलयं. जगभरात सगळीकडेच सेलिब्रेशनचा माहोल आहे.अशातच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओनेदेखील ग्राहकांना खास ऑफर भेट दिली आहे. बंपर डिस्काऊंटच्या स्वरूपात ही ऑफर आहे. 399 रूपयांचा रिचार्ज केल्यानंतर कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार्‍या पैशांचा वापर करून ग्राहकांना AJIO वर शॉपिंग करण्याची सवलत मिळणार आहे. '

काय असेल ऑफर?

399 रूपयांचं रिचार्ज केल्यानंतर तितक्याच रूपयांचा कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे. त्या कॅशबॅकचा वापर करून AJIO या जिओच्या फॅशन रिटेल वेबसाईटवर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जिओ युजर्ससाठी ही ऑफर 28 डिसेंबर ते 31 जानेवारी या दिवसात वापरू शकतात.

कसा घ्याल फायदा?

तुम्ही जिओ युजर्स असाल तर तुमच्या My Jio अ‍ॅपमध्ये जाऊन तुमच्या नंबरवरून 399 रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. यानंतर तुम्हांला 399 रूपयांचं डिस्काऊंट मिळेल. तुम्हांला डिस्काऊंट कूपन My Jio अ‍ॅपच्या My Coupon या सेक्शनमध्ये दिसेल. AJIO वर शॉपिंग करताना त्याचा वापर करता येऊ शकतो. 2016 साली ही साईट लॉन्च करण्यात आली होती.