Fact Check: कोरोना संकट असतानाही मनालीत पर्यटकांची प्रचंड गर्दी? व्हायरल फोटोमागचे सत्य घ्या जाणून
Manali Viral Photo (Photo Credit: Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून गर्दीचे फोटो व्हायरल (Viral Photo) होत आहेत. दरम्यान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या हिल स्टेशनवर गर्दी जमल्याचे फोटो समोर येत आहेत. याचपार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मनाली येथे पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे, असा दावा केला जात आहे. ज्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही सांगतले जात आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, आता या फोटोमागचे सत्य समोर आले आहे. ज्यामुळे नागरिकांमधील संभ्रम दूर होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यानंतर देशात तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीती वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. सध्या सोशल मीडियावर मनाली येथे पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर फॅक्ट चेक वेबसाईट बूम लाईव्हने स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो 31 डिसेंबर 2020 चा आहे. देशात येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भितीपोटी मनाली येथे मोठ्या संख्येत पर्यटक जमल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही बातमीवर विश्वास न ठेवता त्याची खात्री करणे अधिक गरजेचे आहे. हे देखील वाचा- PIB Fact Check: भारत सरकार कडून 'कोरोना केयर फंड योजना' अंतर्गत सार्‍यांना 4000 रूपयांची मदत मिळणार? पहा या वायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मागील सत्य

ट्वीट-

सध्या सोशल मीडियात झपाट्याने पसरणारे खोटे वृत्त पाहता निर्माण होणारा गोंधळ पाहता आता सरकारचं एक पाऊल पुढे आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेत खोटी आर्थिक मदत, वैद्यकीय सल्ले ते नोकरीची आमिष अशा अनेक प्रकारच्या खोट्या बातम्यांमधून नागरिकांची फसवणूक झाल्याचं पहायला मिळालं आहे. सरकार कडून वेळोवेळी वायरल होणार्‍या खोट्या बातम्यांची सत्यता पीआयबी फॅक्ट चेक या ट्वीटर अकाऊंट वरून जनतेसमोर ठेवली जात आहे त्यामुळे तुमच्याकडे आलेल्या देखील कोणत्याही माहितीवर थेट विश्वास ठेवू नका. सरकारी वेबसाईट आणि अधिकृत सुत्रांकडूनच माहिती तपासून त्याच्यावर विश्वास ठेवा.