Screenshot of fake news shared by PIB | (Photo Credits: Twitter/@PIBFactCheck)

गरीब आणि बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या महिलांना 0% व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज मिळणार असा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धन लक्ष्मी योजनेअंतर्गत (PM Dhan Laxmi Yojana) गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे कर्ज देण्यात येत आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संकटकाळात अनेक फेक न्यूज, चुकीची माहिती प्रचंड प्रमाणात व्हायरल केली जात आहे. अनेकदा PIB Fact Check कडून त्यामागील सत्यतेचा उलघडा केला जातो. आताही या मेसेज मागील तथ्य पीआयबीने सर्वांसमोर मांडले आहे. (Fact Check: केंद्र सरकार तब्बल 5 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा PIB कडून खुलासा)

मेसेजमधील दावा:

मध्यमवर्गीय आणि गरीब महिला प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनंतर्गत 18-55 वयोगटातील महिलांना 5 लाखपर्यंत लोन मिळेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या कर्जासाठी कोणताही व्याजदर नाही. यासाठी लाभार्थींचे राष्ट्रीयकृत बँकेत अकाऊंट असणे आवश्यक आहे. तसंच पुढे मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची संपत्ती (प्रॉपर्टी) आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पीआयबी फॅक्ट चेक:

ही न्यूज/मेसेज पूर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारची कोणतीही पॉलिसी अस्तित्वात नाही. केंद्राने अशा प्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नाही.

PIB Fact Check Tweet:

कोविड-19 संकटामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाचा GDP ग्रोथ वाढवण्यासाठी आणि लघु, मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या आर्थिक योजना राबवल्या आहेत. परंतु, केंद्र सरकारने महिलांसाठी अशा प्रकराच्या कोणत्याही योजना सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. नागरिकांना अशाप्रकारच्या मेसेजपासून सावध राहणे गरजेचे आहे.