Fact Check: केंद्र सरकार तब्बल 5 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा PIB कडून खुलासा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. ज्यामुळे मोठ्या संख्येत लोकांनी रोजगार देखील गमवला आहे. यातच केंद्र सरकार (Central Government) तब्बल 5 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) नोकरीवरून काढून टाकणार आहे, असा मॅसेज सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या मॅसेजचा पीआयबीकडून (PIB) खुलासा करण्यात आला आहे. केंद्राकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांना (Fake News) बळी पडू नये, असेही आवाहन पीआयबीने केले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. लॉकडाउन दरम्यान सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या माहितीचा प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच केंद्र सरकार तब्बल 5 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना नोकरी काढून टाकणार आहेत, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका वृत्तपत्रामध्ये ही माहिती छापून आल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. यामुळे नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नका असे, प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Fact Check: कोईम्बतूर शहरात हिंदूना बिर्याणीतून दिल्या जाताय नपुंसक बनवण्याच्या गोळ्या? काय आहे या व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या

पीआयबी फॅक्ट चेक ट्वीट-

लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत खोटी माहितीचा प्रसार केल्याप्रकरणी 467 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 255 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहीती महाराष्ट्र सायबरच्या ट्विटर हॅंडलवरून देण्यात आली आहे.