फेसबुक व्हायरल पोस्टमागील सत्य (PC - Facebook)

पंकज अहीर (Pankaj Ahir) नावाच्या एका फेसबुक युजर्सने (Facebook User) आपल्या अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आहेत. त्याने दावा केला आहे की, तमिळनाडूच्या कोईम्बतूर शहरात (Coimbatore City) एक मुस्लिम व्यक्ती (Muslim Man) हिंदूंना (Hindus) बिर्याणीमध्ये (Biryani) नपुंसक बनवण्याचे औषध (Injecting Impotency Drugs) मिळवत आहे. त्यामुळे मुस्लिमांकडून कोणतेही सामान खरेदी करु नका, असं आवाहन या युजर्सने केलं आहे.

पंकजने फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं की, कोईम्बतूर शहरामध्ये 'माशा अल्लाह' नावाच्या फास्ट फुड हॉटेलमध्ये दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये बिर्याणी बनविली जाते. यातील एका भांड्यात मुस्लिम व्यक्तीसाठी तर दुसऱ्या भांड्यात हिंदु व्यक्तीसाठी. हिंदुची लोकसंख्या कमी व्हावी यासाठी त्यांच्या ताटात नपुंसक बनवण्यासाठी टेबलेट टाकल्या जातात. हा केवळ ट्रेलर आहे. खरा चित्रपट आणखी खूप मोठा आहे. विचार करा, किती वाईट पद्धतीने जिहादींनी आपल्याला घेरले आहे. माहिती नाही, कसे-कसे जिहाद चालवले जात आहेत. हिंदुंना संपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कारस्थान केलं जात आहे. मात्र, हिंदू याचं भान नाही. ते आणखी झोपलेले आहेत. हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न करणारे लोक दूर केले जातात. अद्याप त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घालण्याची वेळ आहे. आजपासून त्यांच्याकडून कोणतही सामान खरेदी करणार नाही, अशी शपथ घ्या, असंही पंकजने पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Fact Check: नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 10000 रुपयांची स्कॉलरशिप देत आहे? PBI ने सांगितले व्हायरल पोस्टमागील सत्य)

दरम्यान, पंकजने शेअर केलेल्या फोटोमध्ये जाळीदार टोपी घातलेल्या व्यक्तीच्या हातात बिर्याणीची प्लेट आहे. दुसऱ्या फोटोत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या व्यक्तींना पोलिस घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतयं. तसेच तिसऱ्या फोटोत पोलिस या दोन व्यक्तींसोबत पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. याशिवाय चौथ्या फोटोत टेबलेट्स पाहायला मिळत आहेत.

Fact Check -

पंकज अहीर नावाच्या युजर्सने शेअर केलेले हे चारही फोटो वेगवेगळ्या प्रकरणातील आहे. हे सर्व फोटो जुने आहेत. या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर ‘Street Foodie Official - Cook with Muslim Recipes’ नावाच्या एक यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक मिळाली. हा व्हिडिओ 30 जून 2016 रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला हा पहिला फोटो थंबनेल म्हणून वापरण्यात आला आहे.

याशिवाय दुसरा आणि तिसरा फोटो मागील वर्षी उत्तर प्रदेशच्या बिजनौर मध्ये एक मदरशात झालेल्या छापेमारी संदर्भातील आहे. दुसरा फोटो बिजनौर पोलिसांच्या अधिकृत हँडलवर ट्विट करण्यात आलेला आहे. या ट्विटनुसार, शेरकोट मध्ये मदरशांत अवैध शस्त्रांची तस्करी केली जात होती. त्यामुळे या प्रकरणी 6 आरोपींना 1 पिस्तूल, 4 बंदुक व दारुगोळासह अटक करण्यात आली होती. त्यामुळे दुसरा आणि तिसरा फोटोदेखील जुना असून वेगळ्या प्रकरणातील आहे.

दरम्यान, चौथा फोटो गेल्यावर्षी श्रीलंकेच्या कोलंबो मध्ये मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करण्यात आले होते. या आर्टिकलमध्ये हेच फोटो वापरण्यात आले आहेत. या फोटोंचा वापर पंकने आपल्या पोस्टमध्ये केला. थोडक्याने पंकज अहीर नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्टमधून केलेला दावा खोटा आहे.