Fact Check: 'COVIPRI' नावाने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहे? PIB ने सांगितले सत्य
PIB Fact Check (Photo Credits: Twitter)

देशातील कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांची चिंता वाढत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) देशभरात चालली धावपळ बातम्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. या गंभीर परिस्थितीतही रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, फेक इजेक्शन विकणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यात भरीस भर म्हणून सोशल मीडियाद्वारे पसरवरी जाणारी माहिती. फेक न्यूजमुळे (Fake News) नक्कीच दिशाभूल करते. त्याचबरोबर अशा बातम्यांमुळे नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे समोर येत आहे. यात 'COVIPRI' नावाने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत त्या इंजेक्शनच्या बॉक्सचा फोटो देखील शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या मेसेजचे पीआयबीने फॅक्ट चेक केले असून त्यामागील सत्याचा खुलासा केला आहे. COVIPRI नावाने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसून हा मेसेज खोटा आहे, असे पीआयबीने म्हटले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची औषधं खरेदी करु नका आणि खोट्या, बनावट औषधं, इंजेक्शन्सपासून सावध रहा. (Fact Check: ऑक्सिजनला पर्याय म्हणून होमिओपॅथी औषध Aspidosperma Q20 घेता येईल का? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

Fact Check By PIB:

यापूर्वी कोरोना व्हायरस संकटात अनेक अफवा सोशल मीडिया माध्यमांतून पसरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे फॅक्ट चेक केल्याशिवाय कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येते. त्याचबरोबर पीआयबी फॅक्ट चेक देखील अनेक फेक मेसेजमागील सत्य उलघडून नागरिकांना सतर्क करण्याचे काम सातत्याने करत आहे.