Aspidosperma Q20 Vrial Message (PC - Twitter)

Fact Check: कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंटमध्ये सापडलेल्या रूग्णांमध्ये ऑक्सिजन (Oxygen) सेचुरेशन पातळी कमी झाल्याच्या तक्रारी आहेत. यामुळेचं देशातील बर्‍याच राज्यात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. अशा परिस्थितीत होमिओपॅथीच्या औषधाची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, ते घेतल्यास आपल्या ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. चला या पोस्टमागील सत्य जाणून घेऊयात ...(वाचा - Fact Check: नाकात लिंबूचा रस घातल्यावर 5 सेकंदामध्ये बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

सोशल मीडियावर हा संदेश व्हायरल होत आहे

व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जर ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तर ऑक्सिजन मिळण्याची वाट पाहू नका. एक कप पाण्यात ASPIDOSPERMA Q 20 चा थेंब घेऊन ऑक्सिजनची पातळी त्वरित राखली जाईल. हे होमिओपॅथिक औषध आहे.

ही पोस्ट बरोबर आहे का? तज्ञांकडून जाणून घ्या

वेबदुनियाशी बोलताना आयुष मंत्रालयातील वैज्ञानिक सल्लागार डॉ. एके द्विवेदी म्हणाले की, जर ऑक्सिजन सेचुरेशन पातळी काही बिंदूंनी कमी झाली तर या औषधाद्वारे (ASPIDOSPERMA Q) ती राखली जाऊ शकते. काही लोक या औषधासह कार्बो वेज (Carbo Veg) देखील घेत आहेत, ज्यामुळे त्यांना फरक पडला आहे. परंतु जर समस्या अधिक असेल किंवा ऑक्सिजन संपृक्तता पातळी 93 च्या खाली असेल तर उशीर न करता रुग्णालयात जा आणि ऑक्सिजनचा आधार घ्या. या औषधामधून ऑक्सिजनची पातळी कायम टिकत नाही.

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरचं औषधोपचार सुरू करा

कोरोना काळात, अशा बर्‍याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात साथीच्या आजारावर उपचार, घरगुती सूचना किंवा औषधोपचार संबंधी माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत काही लोक माहितीच्या अभावी हा संदेश स्वीकारतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे सुरू करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने औषध खाऊ नये. कोणत्याही संशोधनाशिवाय उपचार करणे आणि स्वत: औषधे घेणे, नुकसानदायी ठरू शकते.