पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावून कोरोनाच्या संकटात (Coronavirus) आपली एकी दाखवून देण्याचे आवाहन केले. या प्रत्येकाने आपल्या खिडकीत, दारात दिवे लावून त्याचे नाके फोटो व्हिडीओ सुद्धा शेअर केले. मात्र या व्हिडीओज मध्ये आणखीन एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, विशेष म्हणजे हा व्हिडीओ भारतातील नसून ब्राझील (Brazil) मधील असल्याचे म्हंटले जात आहे. नरेंद्र मोदी यांची दिये जलाओ अभियानाची घोषणा ब्राझील मधील रहिवाशांनी सुद्धा पाळली आणि त्यांनी सुद्धा आपल्या घराबाहेर येऊन मोबाईलचे फ्लॅशलाईट्स, मेणबत्त्या पेटवल्या अशा आशयाची माहिती देणारे कॅप्शन सुद्धा या व्हिडिओला देण्यात आले आहे. हा व्हिडीओ मॉर्फिंग केल्याचा संशय येत नाही त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा आमही प्रयत्न केला. त्यातून काय निष्पन्न झाले हे तुम्हीही पहा. Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #9PM9Minutes या उपक्रमावेळी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या नासा उपग्रहाच्या फोटोंमागील सत्य जाणून घ्या सविस्तर
प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडीओ खरा असून यातील लोक हे ब्राझीलचेच रहिवाशी आहेत, आता पर्यंत या व्हिडिओला 86 हजार वेळा शेअर करण्यात आले आहे त्यावर हजारो लाईक्स सुद्धा आहेत. Janielly Araujo नामक व्यक्तीने हा व्हिडीओ सर्वात आधी शेअर केला होता. मात्र हे बरेच जुने फुटेज आहे.त्यामुळे त्याचा मोदींच्या सांगण्याशी किंवा एकूणच दिया जलाओ अभियानाशी काहीच संबंध नाही असे स्पष्ट होत आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान, मोदींच्या आवाहनाला भारतातील सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी ते अगदी मोठमोठे उद्योगपती सर्वांनीच उत्साहानी प्रतिसाद दिला. याविषयी मोदींनी सुद्धा देशवासीयांचे कौतुक करून देशातून कोरोनामुळे झालेला नैराश्याचा अंधकार दूर करण्यासाठी आभार मानले.
दुसरीकडे हा सर्व प्रकार जरी दिलासा देणारा असला तरी कोरोनाचे संकट काही नष्ट झालेले नाही. उलट आज कोरोनाबाधित रुग्णानाची संख्या भारतभरात 4067 वर पोहचली आहेत तर आकड्याने शंभरी पार केली आहे. जगभरात या व्हायरसने आतापर्यंत 67 हजार बळी घेतले आहेत.