Fake NASA satellite images of India (Photo Credits: Twitter)

कोविड-19 सारख्या महाभयाण संकटाविरुद्ध लढण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल ला म्हणजे आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करुन दारात किंवा खिडक्यात दिवे लावण्यास सांगितले होते. त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आणि त्यानंतर सोशल मिडियावर लोकांच्या कमेंट्सवर कमेंट्स येऊ लागल्या आणि #9PM9Minutes हा हॅशटॅग देखील ट्रेंड होऊ लागला. मग नेटक-यांची सोशल मिडियावरील चर्चा अगदी मजा-मस्करीमध्ये होऊ लागली आणि त्यात काहींनी नासा उपग्रहाचा फोटो शेअर करुन आज भारत कसा दिसेल असे सांगितले. हा फोटो खोटा असून तुम्हाला या फोटोमागचे सत्य माहित आहे का?

हा फोटो नासाने दिवाळीत भारत कसा दिसतो तेव्हाचा आहे. हा फोटो पंतप्रधानांनी दिवे लावण्याची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर खूप ट्रेंड होऊ लागला. त्यांच्या या उपक्रमाला लोकांना मजेशीर रित्या घेऊन 5 एप्रिलला भारतात दिवाळी साजरी होतेय असे बोलू लागले आणि #Diwali देखील ट्रेंड होऊ लागला.

हेदेखील वाचा- Fact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते? WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा

3 एप्रिलचे ट्विट:

5 एप्रिलला कसा दिसेल भारत:

त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एका नेटक-याने नासाचा हा दिवाळीमधला फोटो टाकून आज भारत असा दिसेल असे सांगितले तर काहींनी आज भारत असा दिसला असेही सांगितले. त्यामुळे अनेकांनी यावर विश्वास देखील ठेवला. मात्र हा फोटो हा आजचा नसून तो दिवाळीतील आहे.

त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही फोटोंवर विश्वास ठेवू नये . असे अनेक फोटो पुढील काही दिवसांत येतील पण हे सर्व एडिट केलेले फोटो आहेत. हे लक्षात ठेवा.