सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या बातम्या व्हायरल होत असतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवणे हे अनेकवेळा नुकसानदायक ठरू शकते. मोदी सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. यापैकी अनेक योजनांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. मात्र अशा सरकारी योजनांच्या बहाण्याने सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी अनेक खोटे मेसेजेस व्हायरल (False Viral Message) करत असतात. असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केले आहे की, भारत सरकार पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपये भत्ता देत आहे.
या मेसेजसोबत एक लिंक देण्यात आली असून, त्यावर क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकाल असे यात म्हटले आहेत. असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. पीआयबीने (PIB) मोदी सरकार देत असल्याच्या बेरोजगार भत्त्याच्या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली आहे. फेक न्यूजच्या सत्यतेची चौकशी करणाऱ्या या प्रमुख सरकारी एजन्सीने हा व्हायरल दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष; PIB ने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा)
एक वायरल #Whatsapp मैसेज में दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना के तहत सरकार बेरोजगार युवाओं को हर महीने ₹6,000 का भत्ता दे रही है #PIBFactCheck
▶️ यह मैसेज फर्जी है
▶️ भारत सरकार ऐसी कोई योजना नहीं चला रही
▶️ कृपया ऐसे मैसेज फॉरवर्ड ना करें pic.twitter.com/jwqhr6hVk2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 7, 2022
पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘व्हायरल #Whatsapp संदेशामध्ये दावा केला जात आहे की भारत सरकार पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपये भत्ता देत आहे. हा संदेश खोटा आहे. भारत सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही. कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नका.’ तसेच या व्हायरल मेसेजसोबत पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून, त्यावर तुमची सर्व माहिती भरल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते व तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे अशा खोट्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहनही केले गेले आहे.