कोरोना विषाणूच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत जनतेने जे अनुभवले त्यावरून सरकारी नोकऱ्या (Government Jobs) केव्हाही चांगल्या अशी धारणा होत आहे. सरकारी नोकरी मिळवणे हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत करतात अनेक प्रयत्न करतात. भारतातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत आहे. याचाच फायदा घेत बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली आजकाल फसवणूकही केली जात आहे.
तर, तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवण्याच्या नावाने काही मेसेज किंवा लिंक मिळाली तर त्यावर क्लिक करण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी त्यासंबंधीची सर्व माहिती गोळा करा. सोशल मीडियावर, भारतीय मिशन रोजगार योजना नावाची वेबसाइट 1280 रुपयांच्या अर्ज फीच्या बदल्यात बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देण्याचा दावा करत आहे. बेरोजगारांना 1280 रुपयांचा अर्ज करावा लागेल आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळतील, असे संकेतस्थळावर सांगण्यात येत आहे. यासोबत एक लिंकही शेअर केली जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा तपशील भरायचा आहे.
भारतीय मिशन रोजगार योजना नाम की एक वेबसाइट बेरोजगारों को 1280 रुपए के आवेदन शुल्क के बदले सरकारी नौकरी दिलाने का दावा कर रही है।#PIBFactCheck
➡️यह वेबसाइट फर्जी है।
➡️भारत सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है।
➡️ऐसी धोखाधड़ी से सावधान रहें। pic.twitter.com/hz9ZOV0Znh
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 4, 2022
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) फॅक्ट चेकने या संदेशाची सत्यता तपासली आहे. फॅक्ट चेक टीमने ट्विट केले की, ‘भारतीय मिशन रोजगार योजना नावाची वेबसाइट 1280 रुपयांच्या अर्ज फीच्या बदल्यात बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देण्याचा दावा करत आहे. परंतु ही वेबसाइट बनावट आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही. अशा फसवणुकीपासून सावध रहा. अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून, तुमचा डेटा शेअर करून ऑनलाइन फसवणुकीचे बळी होऊ शकता.’ (हेही वाचा: निवडणुकीत मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये होणार कट; सोशल मिडीयावर Fake News व्हायरल, जाणून घ्या सत्य)
दरम्यान, इकॉनॉमिक्स टाइम्समधील डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आधारे भारतातील बेरोजगारीची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारतात 53 दशलक्ष किंवा 5.3 लोक बेरोजगार आहेत. यापैकी 35 दशलक्ष लोक असे आहेत जे सक्रियपणे रोजगाराच्या शोधात आहेत. यापैकी 8 दशलक्ष महिला आहेत.