Fact Check: दिल्लीतील 200 पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी नोकरी सोडली? जाणून घ्या व्हायरल बातमी मागील सत्य
Fact Check (Photo Credits-Twitter)

Fact Check: कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. जेव्हा ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीतील काही परिसरात हिंसाचार होण्यासह पोलिसांसोबत वाद ही झाले. यामध्ये 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. अशातच आता दिल्ली पोलिसांसंदर्भात सोशल मीडियात एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, दिल्ली पोलिसांच्या 200 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी नोकरीचा राजीनामा दिला आहे. परंतु PIB ने याची सत्यता शोधून काढल्यानंतर ही व्हायरल झालेली बातमी फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.(Fact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा? PIB ने केला खुलासा)

पीआयबीकडून या बद्दल फॅक्ट चेक केल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, दिल्लीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याची जी बातमी व्हायरल होतेय ती खोटी आहे. म्हणजेच पीआयबी कडून स्पष्ट केले आहे की, दिल्लीतील पोलिसांनी राजीनामा दिल्याची कोणतीच बातमी आलेली नाही.(Fact Check: किसान क्रेडिट कार्ड लोन वर 7% ऐवजी 12% व्याजदर? काय आहे व्हायरल मेसेज मागील सत्य? जाणून घ्या)

Tweet:

तर याच्या एक दिवस आधी सोशल मीडियात काही अशाच पद्धतीची बातमी व्हायरल झाली होती. या व्हायरल बातमीत दावा केला होता की, केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलसाठी नवे संचार नियम लागू केले आहेत. दरम्यान, पीआयबीकडून याचे सुद्धा फॅक्ट चेक करण्यात आल्यानंतर ती फेक असल्याचे सांगितले गेले.