सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात किसान क्रेडिट लोन (Kisan Credit Card Loan) वर 7 टक्क्यांऐवजी 12 टक्के व्याजदर आकारला जाईल, असा दावा करण्यात आला आहे. एका वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला असून ही बातमी सध्या एक व्हायरल पोस्ट झाली आहे. ज्यात लिहिले आहे की, नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अजून एक झटका दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सुरु झालेली किसान क्रेडिट लोन आता 12% व्याजदरावर देण्यात येणार आहे. आरबीआयने सर्व राष्ट्रीयकृत बँकांसाठी हे निर्देश जारी केले आहेत. तसंच हा नियम 1 एप्रिल पासून लागू होणार असल्याचेही यात म्हटले आहे. (Fact Check: पीएम मुद्रा योजने अंतर्गत लोन घेण्यासाठी लीगल चार्जसाठी आकारावे लागतील 2,150 रुपये? PIB ने केला व्हायरल Approval Letter मागील खुलासा)
पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले की, "हा दावा फेक आहे. केंद्र सरकारने केसीसी लोन व्याजदरात वाढ झाल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही." (Fact Check: सरकारी कर्मचाऱ्यांना Encashment ऐवजी वर्षाला 20 Earned Leave घेणे बंधनकारक? जाणून घ्या व्हायरल बातमी मागील सत्य)
Fact Check By PIB:
दावा: एक #खबर में दावा किया जा रहा है कि अब किसान क्रेडिट कार्ड लोन 7% की जगह 12% ब्याज दर पर मिलेगा। #PIBFactCheck: यह दावा फ़र्ज़ी है। केंद्र सरकार ने केसीसी लोन के ब्याज दर को बढ़ाने के संबंध में ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/VLxMRRxKnK
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 21, 2021
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटकाळात फेक न्यूजंना उधाण आले. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या फेक न्यूज व्हायरल होऊ लागल्या. त्यामुळे नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पीआयबीने कंबर कसली आणि फेक न्यूजमागील सत्याचा उलघडा केला. तसंच फेक न्यूजला बळी न पडण्याचे आवाहन सरकार कडून वारंवार करण्यात येत आहे.