कोरोना व्हायरस संकट (Coronavirus Pandemic) काळापासून सुरु झालेले फेक न्यूजचं (Fake News) सत्र अद्याप कायम आहे. यात आता अजून एका फेक मेसेजची भर पडली आहे. भारत सरकारने एका संस्थेसोबत भागीदारी केली असून त्यामार्फत वर्क फ्रॉम होम (Work From Home) ची संधी दिली जात आहे, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp Message) वेगाने व्हायरल होत आहे. लोकांची यामार्फत फसवणूक होऊ नये, म्हणून पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या मेसेजचा केलेला खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे.
हा मेसेज फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. "हा मेसेज फेक असून अशा प्रकारची कोणतीही घोषणा भारत सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे फ्रॉड लिंक्सना बळी पडू नका", असे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (PIB Fact Check: कोरोनाच्या मोफत उपचारासाठी केंद्र सरकार देत आहे 4000 रुपये? व्हायरल बातमीमागील सत्य घ्या जाणून)
Fact Check By PIB:
It is being claimed in a #WhatsApp message that the Government of India in collaboration with an organisation is providing work from home opportunities.#PIBFactCheck:
▶️This claim is #FAKE
▶️No such announcement has been made by GOI
▶️Do not engage with such fraudulent links pic.twitter.com/hJ4MhMXphu
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 23, 2021
खोट्या लिंक्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. तसंच सोशल मीडियावर फेक मेसेज दिशाभूल करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजवर अंधपणे विश्वास ठेवणे टाळा. त्याचबरोबर असे मेसेज फॉरवर्ड देखील करु नका. त्यामुळे तुमच्यासोबतच इतरांचेही नुकसान होणार नाही. कोणताही खोटा मेसेज, माहिती याची पडताळणी करण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.