Fact Check: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेअंतर्गत केंद्र सरकार देणार 2 लाख रुपये? जाणून घ्या पोस्ट मागील तथ्य
Beti Bachao Beti Padhao (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात सोशल मीडियावर फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले. यात काही सरकारी योजनांचाही समावेश करण्यात आला होता. आता अजून एक अशीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केंद्र सरकार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) योजनेअंतर्गत 2 लाख रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. तसंच सोबत एक फॉर्मही जोडण्यात आला आहे. हा फॉर्म भरल्यानंतर केंद्र सरकारकडून या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. (Fact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार? PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा)

या व्हायरल पोस्ट मागील सत्यता पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) कडून तपासण्यात आली आहे. दरम्यान, ही पोस्ट खोटी असून केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसंच त्यासोबत जोडलेला फॉर्म देखील फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोस्टमधील दावा: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व मुलींना 2 लाख रुपये देणार.

पीआयबी फॅक्ट चेक: हा फॉर्म खोटा आहे. अशा प्रकराच्या फॉर्मचे वाटप करणे अवैध आहे. या योजनेअंतर्गत कोणताही आर्थिक लाभ दिला जात नाही.

Fact Check by PIB:

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 मध्ये केली होती. स्त्रीभ्रुण हत्या थांबून मुलींच्या शिक्षणासंदर्भात जागरुकता निर्माण करणे, हा या योजनेमागील उद्देश आहे. दरम्यान, सरकारी योजनेच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या खोट्या पोस्ट, बातम्या यांच्यावर विश्वास ठेवू नका. याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तसंच अशा प्रकारचे फेक मेसेजेस फॉरवर्ड करु नका, त्यामुळे आपल्याबरोबरच इतरांचेही नुकसान होणार नाही.