Fact Check| Photo Credits: Twiiter/ PIB Fact Check

सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर सध्या एका व्हायरल पोस्टच्या माध्यमातून Ministry of Corporate Affairs द्वारा एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (National Scholarship Examination)घेऊन 1 लाख रूपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र पीआयबी (PIB) कडून हे वृत्त खोटं असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान व्हायरल पोस्टमध्ये एम एंड एन प्लेटफॉर्म (M&N platform) विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करतात. त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून 1 लाखाची रोख रक्कम मदत म्हणून देणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान दावा करण्यात आलेल्या बातमीमध्ये दिलेली वेबसाईट देखील बनावट असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान 1 लाख बक्षीस आणि कोणतीही परीक्षा होनार नसल्याचं पीआयबीने स्पष्ट केले आहे.

पीआयबी ट्वीट

काही दिवसांपूर्वी जून महिन्यांत देखील खोटा दावा करत विद्यार्थ्यांमध्ये अशाप्रकारे संभ्रम निर्माण करण्यात आला होता. त्यावेळेस राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रूपयांची स्कॉलरशीप देत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पीआयबीने जेव्हा फॅक्ट चेक केले होते तेव्हा तो देखील खोटा असल्याचं सांगण्यात आलं होतं.

सध्या कोविड 19 च्या संकटकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांना बाहेर पडण्यावर बंधनं आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात असलेल्या भीतीचा, अपुर्‍या माहितीचा गैरफायदा घेत खोट्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर वर पसरवल्या जात आहेत.