Fact Check (Photo Credits-Twitter)

संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देत आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावरील फेसबुक,व्हॉट्सअॅप, ट्वीटरवर कोविड19 आणि लॉकडाऊन संदर्भातील काही खोट्या बातम्या आणि माहिती वेगाने व्हायरल होत आहे. अशाच पद्धतीचे एक प्रकरण समोर आले आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार पुन्हा लॉकडाऊन सक्तीने लागू करणार आहे. त्याचसोबत असे ही म्हटले जात आहे की, 18 जून नंतर लॉकडाऊन संदर्भात देण्यत आलेली सूट ही अधिक कमी केली जाणार आहे.

परंतु सोशल मीडियात लॉकडाऊन बाबत व्हायरल झालेल्या या पोस्ट प्रकरणी पीएबी फॅक्ट चेक यांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. या बातमीचे खंडन करत त्यांनी असे म्हटले आहे की, लॉकडाऊन सक्तीने लागू करण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.(Fact Check: प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 0% व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज मिळणार? PIB ने केला या मेसेजचा खुलासा)

अशाच प्रकारच्या एका खोट्या दाव्यात असे सांगण्यात येत होते की, गृह मंत्रालयाने ट्रेन आणि विमान सेवेवर बंदी घालत पुन्हा 15 जून पासून लॉकडाऊन लागू करणार आहे. मात्र सोशल मीडियात पसरवण्यात आलेली ही माहिती फक्त एक अफवा आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडिया सध्या खोट्या बातम्या किंवा माहिती वेगाने परसत आहेत. त्यामुळे नागरिकांना असे अपील करतो की ऑनलाईनवर येणारी प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्यासंबंधित अधिकृत माहिती आहे का ते तपासून पहा. सोशल मीडियात अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर रहा.