Donald Trump | (Photo Credit: Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) याचा हवाला देत फेसबुक (Facebook) या सोशल नेटवर्कींग साईटवर लोकप्रियतेत केवळ आपणच क्रमांक एकवर आहोत. तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) हे दुसऱ्या क्रमांकावर आहे असा दावा ट्विटरच्या माध्यमातून केला. परंतू, त्यांनी केलेल्या दाव्याला काही तास उलटण्या आगोदरच त्यांचा दावा त्यांच्यावरच उलटला आहे.

जगभरातील प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता पडताळली. या पडताळणीत पुढे आले की, ट्रम्प यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. कारण ट्रम्प यांच्या अधिकृत पेजवरील लाइक पाहता त्यांच्यापेक्षाही अधिक लाईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत पेजला आहेत. तर फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? याची पडताळणी केली असता ती व्यक्ती डोनाल्ट ट्रम्प नव्हे तर, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो हा आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे या महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात येत्या 24 फेब्रुवारी 2020 पासून होत आहे. हा दौरा गुजरात राज्यातून होणार आहे. या दौऱ्याबाबत डोनाल्ड ट्रम्प भलतेच खूश आहेत. या दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विट करत आपण भारत दौऱ्याबाबत प्रचंड उत्साही असल्याचे म्हटले आहे. ड्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हा मोठा सन्मान आहे. कारण झकरबर्ग यांनी सांगितले आहे की, फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प क्रमांक १ वर, तर मोदी क्रमांक दोनवर आहेत. मी दोन आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर जात आहे, त्या दौऱ्याकडे मी आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहे'. (हेही वाचा, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मार्क जुकरबर्ग याने फेसबुकवर मला क्रमांक 1 आणि पंतप्रधान मोदींना क्रमांक 2 म्हटले, हा माझ्यासाठी हा मोठा सन्मान')

डोनाल्ड ट्रम्प ट्विट

दरम्यान, थेट आकडेवारीत बोलायचे तर, पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर तब्बल 44 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत पेजवर असलेल्या फॉलोअर्सची संख्या 26 मिलियन इतकी आहे. त्यामुळे फॉलोअर्सच्या बाबतीतही डोनाल्ड ट्रम्प हे मोदींच्या कितीतरी पाठी आहेत. निश्चीत आकडेवारी सांगायची तर ट्रम्प यांच्या अधिकृत पेजला दोन कोटी 59लाख 67 हजार लाइक्स आहेत. तर मोदींच्या अधिकृत पेजला चार कोटी 46 लाख 23 हजार लाइक्स आहेत. ट्विटरवर मात्र, पंतप्रधान मोदी हे डॉनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पाठीमागे आहेत. ट्रम्प यांचे ट्विटर फॉलोअर्स 64.1 मिलियन इतके तर मोदी यांचे 50 मिलीयन इतके आहेत. अर्थात हे आकडे अल्पावधीत वाढतात आणि बऱ्याच प्रमाणात कमीही होतात.