अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trum) येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी या दिवशी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासाठी ट्रम्प हे भलतेच उत्साही असून, खूशही असल्याचे दिसते. ट्रम्प यांनी आज (शनिवार, 15 फेब्रुवारी) एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'फेसबुकचा (Facebook मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) नुकताच भेटला. त्याने मला सांगितले की, मी फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय आहे. फेसबुकवर आपण क्रमांक एकवर आहात. तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला वाटते हा एक मोठा सन्मान आहे. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये भारत दौऱ्यावर निघालो आहे. या दौऱ्याबाबत मी फार खुश आहे.'
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी वेगवेगळे ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की या दौऱ्यात भारत आणि अमेरिका या देशांमध्ये व्यापारविषयक करार होऊ शकतील. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत बुधवारी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा विशेष आहे. हा दौरा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करेन. हे संबंध दोन्ही देशांना एका नव्या दिशेने घेऊन जातील. (हेही वाचा, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर; White House ची माहिती)
डोनाल्ड ट्रम्प ट्विट
Great honor, I think? Mark Zuckerberg recently stated that “Donald J. Trump is Number 1 on Facebook. Number 2 is Prime Minister Modi of India.” Actually, I am going to India in two weeks. Looking forward to it!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 14, 2020
दरम्यान, ट्रम्प यांचे भारतात आगमन झाल्यानंतर ते 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम सरदार पटेल स्टेडियममध्ये पार पडेल. यात ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडपेक्षाही अधिक 1 लाख 10 हजार लोक बसू शकतील इतकी या स्टेडीयमची आसनक्षमता आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. या मौदानावर या कार्यक्रमासाठी सुमारे 1 लाखांपेक्षाही अधिक लो उपस्थित राहतील. दरम्यान, केम छो ट्रम्प कार्यक्रमापूर्वी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे रोड शो करतील आणि साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांना श्रंद्धांजली अर्पण करतील. अहमदाबाद एअरपोर्ट ते साबरमती आश्रम असा 10 किलोमीटर रोडशो करण्याची योजना आखण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी या दिवशी ट्रम्प आणि त्यांची पत्न दिल्लीला पोहोचतील आणि मोदी यांच्याशी सवाद साधतील.