अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर; White House ची माहिती
Donald Trump, Narendra Modi | (File Photo)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार असल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाउस (White House) च्या ट्विटर अकाउंट वरून देण्यात आली आहे. या दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्यासोबत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर ट्रम्प चर्चा करणार आहेत. येत्या काळात दोन्ही देशातील अंतर्गत संबंध सुधारण्यास या दौऱ्याची मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान गुजरात मधील अहमदाबाद येथे 'केम छो, मिस्टर प्रेसिडंट?'(Kem chho, Mr President?) नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौरयावर गेले असताना 'हाऊडी मोदी' (Howdy Modi) हा कार्यक्रम आयोजित करून त्यांचे स्वागत करण्यात आले होते, त्याचप्रकारे ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी भारतात हा केम छो प्रेसिडेंट कार्यक्रम होणार आहे. Donald Trump Impeachment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोगात सर्व आरोपांमधून क्लीन चिट

प्राप्त माहितीनुसार, ट्र्म्प आणि मोदी यांच्यामधील भेटीत व्यापार संबंधित करार होण्याची शक्यत आहे. दोन्ही देशांच्या संगनमताने व्यापार करार झाल्यास अमेरिकेतील कंपन्यांना भारतात व्यवसाय सुरु करता येणे सोप्पे होणार आहे. तसेच भारतीय नागरिकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

White House ट्वीट

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासमवेत भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत दौऱ्याची आठवण करून दिली होती.