Donald Trump Impeachment Trail in Senate: महाभियोगाचा सामना करणारे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा विजय झाला आहे. तर महाभियोगात ट्रम्प यांना सर्व आरोपांमधून क्लीन चिट मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन आरोप लावण्यात आले होते. हिला आरोप म्हणजे, त्यांनी युक्रेनवर 2020 च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे जो बिडेन यांना बदनान करण्यासाठी दबाब आणला होता. दुसरा आरोपात असे म्हटले आहे की, ते कॉंग्रेसला अडथळा आणत होते. मात्र आता या प्रकरणी ट्रम्प यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा निवडणूकीपूर्वी मोठा विजय झाल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी झालेल्या ट्रायलमध्ये रिपब्लिकनच्या बहुमत असलेल्या अमेरिका सीनेटने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या पदाचा दुरोपयोग केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यामध्ये 52 जणांनी ट्रम्प यांना मत दिली असून त्यांच्या विरोधात 48 जणांनी मतदान केले. तर काँग्रेस मध्ये अडथळा आणण्याचा आरोपातून मुक्तता करण्यासाठी त्यांना 53 मते आणि विरोधात 47 मते देण्यात आली.(महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय? अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पद का आहे धोक्यात)
ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी वाद झाल्याचे दिसून आले. एएफपी यांच्या मते, अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरपयोग केल्याने महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिका हाउस मध्ये 230 पैकी 197 मतांनी पास झाला होता. हाउस ऑफ ज्युडिशियरी कमेटी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या दोन आरोपांना 19 डिसेंबर 2019 मध्ये मंजूरी दिली होती.