Fact Check Related to Bharat Biotech (Photo Credits: Twitter)

भारत बायोटेक (Bharat Biotech) चे उपाध्यक्ष डॉ. वि. के. श्रीनिवास (Dr. V. K. Shrinivas) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus)  वरील लस COVAXIN च्या मानवी चाचणीसाठी सर्वात आधी आपल्यावरच प्रयोग करत इंजेक्शन घेतल्याचे वृत्त एका फोटोसहित सध्या व्हायरल होत आहे. श्रीनिवास हे या लसीची चाचणी करून घेणारे पहिले व्यक्ती आहेत असा दावा सुद्धा या व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आला आहे. मात्र हा फोटो आणि पोस्ट खोटा असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे भारत बायोटेक म्हणजेच COVAXIN च्या निर्मात्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जो फोटो व्हायरल होत आहे त्यात श्रीनिवासच आहेत, मात्र हा त्यांना लस देतानाचा नव्हे तर जेव्हा लसनिर्मिती प्रक्रियेतील सर्व सदस्यांची रक्त चाचणी करण्यात आली तेव्हा रक्ताचा नमुना घेतानाचा आहे असे भारत बायोटेक तर्फे सांगण्यात आले आहे. COVID-19 Vaccine: भारतामध्ये COVAXIN पाठोपाठ Zydus Cadila ला देखील मानवी चाचणी साठी परवानगी

काय आहे व्हायरल पोस्ट?

व्हायरल पोस्ट नुसार, डॉ. वि. के. श्रीनिवास म्हणजेच भारत बायोटेकचे उपाध्यक्ष हे कोरोना व्हायरसवरील भारतात बनलेली लस COVAXIN साठी क्लिनिकल चाचणी घेणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांचा त्यांच्या निर्मित उत्पादनावरचा विश्वास कौतुकस्पद आहे असे यात म्हंटलेय.

पहा ट्विट

Fact Check

भारत बायोटेक तर्फे या सर्व व्हायरल पोस्ट वर विशेष स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही जी पोस्ट Whatsapp व अन्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे टी मुळातच भारत बायोटेक तर्फे पोस्ट करण्यात आलेली नाही .शिवाय हे फोटो रक्त नमुने गोळा करत असतानाचे आहेत. याशिवाय आम्ही कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहोत, या प्रक्रियेत आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे आणि कोणतीही हलगर्जी संशोधक, उत्पादक, किंवा चाचणी करताना सुद्धा केली जात नाहीये असे सुद्धा भारत बायोटेक तर्फे सांगण्यात आले आहे.

भारत बायोटेक ट्विट

दरम्यान, भारतात COVAXIN या पहिल्या कोविड 19 लसीला औषध नियामक डीसीजीआय (DCGI) तर्फे I आणि II Phase मध्ये मानवी क्लिनिकल चाचणी साठी मान्यता मिळाली आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ही लस लाँच होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.