भारतामध्ये कोरोना व्हायरस लढण्यासाठी लस विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान Bharat Biotech च्या Covaxin पाठोपाठ आता अहमदाबाद येथील
Zydus Cadila Healthcare Ltd ला कोविड 19 विरूद्ध लढण्यासाठी लसीला Drugs Controller General of India कडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता फेझ 1 आणि फेझ 2 मधील क्लिनिकल ट्रायलला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज ICMR ने दिलेल्या पत्रानुसार COVAXIN चे क्लिनिकल रिपोर्ट्स 15 ऑगस्ट पर्यंत जाहीर करून लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिलासादायक! भारतात 15 ऑगस्ट ला लाँच होऊ शकते COVID-19 वरची 'COVAXIN' लस.
दरम्यान कोणतीही लस ही मानवी चाचणीमध्ये 3 टप्प्यांमधून जाते. यामध्ये पहिला टप्पा हा अगदीचा ठराविक लोकांसाठी असतो. यामध्ये लसीची मानवी शरीरावर चाचणी करून त्याचा प्रभाव पाहिला जातो. फेझ 2 मध्ये मिड स्केल मध्ये अंदाजे शेकडो लोकांवर लस देऊन त्याची मात्रा अणि परिणाम पाहण्यासाठी चाचणी केली जाते. तर फेझ 3 मध्ये बहुसंख्य लोकांवर रॅन्डम टेस्ट केल्या जातात. त्याचे अहवाल तपासून पाहून पुढील निर्णय घेतला जातो.
सध्या भारतामध्ये वाढत असलेला कोरोनाचा धोका पाहता आता कमीत कमी वेळेत अधिक प्रभावी लस बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताप्रमाणेच परदेशात अनेक कंपन्या आणि संशोधकलस बनवण्याचे काम करत आहेत.
भारतामध्ये आज कोरोनाबाधितांचा 24 तासांमध्ये सर्वाधिक 20 हजाराहून अधिक रूग्ण समोर आले आहेत. तर जगभरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव सुरू होऊन सहा महिने झाले आहेत. अद्याप या आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे जीवघेण्या या कोविड 19 ला आळा घालण्यासाठी लस शोधण्यासाठी धडपड सुरू आहे.