
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने अक्षरश: हाहाकार माजविला असून दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे ते कोविडवर सक्षम लस कधी येणार याकडे. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ज्यानुसार येत्या 15 ऑगस्टला भारतात (India) कोरोनावर प्रभावी COVAXIN लस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची लस म्हणजे फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटिक यांनी ही लस तयार केली आहे. त्यामुळे भारत बायोटिक आणि ICMR कडून ही लस लाँच होण्याची शक्यता आहे.
भारतात दरदिवास जवळपास 18,000 ते 20,000 रुग्ण आढळून येत आहे. ही चिंताजनक बाब असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी पर्यत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावरील लस लवकरात लवकर भारतात येणे गरजेचे आहे. येत्या 7 जुलैपासून कोवाक्सिन लसीची मानवी चाचणी सुरु केली जाईल. यानंतर सर्व ट्रायल यशस्वी झाल्यास 15 ऑगस्टला ही लस लाँच केली जाऊ शकते. 'अश्वगंधा’ कोरोनावर प्रभावी औषध ठरु शकते; IIT दिल्ली आणि जपानी संस्थेचा दावा
देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी काही औषधे बाजारात आली आहेत, पण उपचारासाठी याची पूर्णपणे हमी दिलेली नाही. अशा परिस्थितीत केवळ कोरोना वॅक्सीनच कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.
भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 25 हजार 544 वर पोहोचली आहे. यात काल (2 जुलै) ला देशात 20,903 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर काल 379 रुग्ण दगावले असून रुग्णांच्या मृतांचा आकडा 18,213 वर पोहोचली आहे.