Fact Check: निवृत्तीवेतनधारकांनी खासगी रुग्णालयात कोविड19 लसीकरण केल्यास CGHS कडून  बिलाची रक्कम मिळणार? पहा या वायरल बातमीवर PIB ने केलेला खुलासा
Representational Image | (Photo Credits: File Image)

भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाला (COVID 19 Vaccination) सुरूवात होऊन आता 2 महिन्यांचा काळ उलटला आहे. सुरूवातीला केवळ कोविड योद्धे नंतर सहव्याधी आणि वयोवृद्ध आणि आता 45 वर्षावरील सार्‍यांना सरसकट लस देण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान या लसीकरणाबाबत अजूनही अनेक किंतू-परंतू लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे काहीजण याबाबत अफवा पसवत असल्याचंही समोर येत आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये या लसीकरणामध्ये निवृत्तीवेतनधारकांनी (Pensioners)  खासगी रुग्णालयात लसीकरण केल्यास सीजीएचएस (CGHS) कडून त्यांना बिलाची रक्कम मिळेल असा दावा केला जात आहे. मात्र PIB Fact Check हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. लाभार्थ्यांना खासगी रुग्णालयात लसीकण केल्यास CGHS कडून बिलाची रक्कम मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

PIB Fact Check ने वृत्ताचा दाखला देत पेंशन धारकांना खाजगी रूग्णालयात 250 देऊन लस घेतल्यास त्याचे पैसे सीजीएचएस देणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. दरम्यान देशात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. या लसींसाठी खाजगी रूग्णालयात 250 रूपये प्रति डोस मोजावे लागणार आहेत तर सरकारी रूग्णालयात लसीकरण मोफत असणार आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

पीआयबी ट्वीट

देशभरात सध्या को विन या अ‍ॅपच्या माध्यमातूनच लसीकरणासाठी नोंदणी केली जाते. या नोंदणीनंतर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली जाणार आहे. सध्या देशात महाराष्ट्र राज्य लसीकरणात अव्वल आहे. 65 लाखापेक्षा अधिक लोकांना राज्यांत लस देण्यात आली आहे तर आता दिवसाला लाखभर लोकांना लस देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे.