Zebra Crossing (Photo Credit - Pixabay)

मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील अथवा गावातील रस्त्यांवरुन आपण गेला तर आपणास झेब्रा क्रॉसिंग (Zebra Crossing in Mumbai) नेहमी काळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसते. मात्र, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात एमएमआरडीए (MMRDA ) कार्यालय परिसरात जाल तर तुम्हाला काहीसे वेगळे रंग पाहायला मिळतील. होय, मुंबई शहरात आता प्रथमच दोन झेब्रा क्रॉसिंगचा (Zebra Crossing) रंग बदलण्यात आला आहे. या परिसरात आता लाल आणि पांढरा रंग वापरलेले झेब्रा क्रॉसिंग पाहायला मिळत आहे. प्रवासी आणि वाहनचालकांना सोपे जावे आणि झेब्रा क्रॉसिंग (Zebra Crossing) असल्याची दृश्यमानता अधिक चांगली व्हावी यासाठी लखनौ आणि नाशिकसह इतर काही शहरांमध्ये क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आहेत. मुंबईतही त्याचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. इंडियन रोड काँग्रेस (IRC) कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग वापरल्याचे सांगितले जात आहे.

अनेक ठिकाणी रस्ता डांबरी आणि सिमेंटचा पाहायला मिळतो. या रस्त्यांवर रंगांच्या खुणा वेगवेळ्या असतात. त्यात जाणवेल इतका फरक असतो. डांबरी रस्ता असेल तर त्यावर असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे दिसतात. हे पट्टे डांबरी रस्त्यांवर योग्य प्रमाणात दिसतात. मात्र, सिमेंटच्या रस्त्यांवर हे पट्टे फारसे जाणवून येत नाहीत. नीट दिसत नाहीत. त्यामुळे आयआरसी सांगते की, रहदारीचा भाग, गर्दीचे रस्ते असलेल्या ठिकाणी कलर कोड 35 - लाल रंगाचा वापर केल्यास चालू शकते. (हेही वाचा, Mumbai: मुंबईकरांची Heavy Traffic पासून सुटका होण्याची शक्यता; शहरात लवकरच सुरु होणार Water Taxis आणि ROPAX Ferries)

बीकेसी हा कॉर्पोरेट परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विविध प्रकारची सरकारी कार्यालये, बँका आणि खासगी कंपन्यांची मोठ-मोठी कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात रस्ते नेहमीच वर्दळ असलेले दिसतात. अशा वेळी या ठिकाणी संबंधित भागातील रहदारीनुसार झेब्रा क्रॉसिंगला लाल रंग दिला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत लाल रंगाचा वापर झेब्रा क्रॉसिंगवर वाढत आहे, अशी माहिती आयआरसीचे उपसंचालक (तांत्रिक) राहुल पाटील यांनी दिली आहे.