Mumbai: मुंबईकरांची Heavy Traffic पासून सुटका होण्याची शक्यता; शहरात लवकरच सुरु होणार Water Taxis आणि ROPAX Ferries
Water Taxi (Photo Credits-Twitter)

मुंबईमध्ये (Mumbai) सार्वजनिक वाहतूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही, शहरातील रहदारी ही नेहमीच चिंतेची बाब ठरली आहे. आता मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांना लवकरच ट्राफिकच्या त्रासातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. लोकांच्या सोयीसाठी, वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने (Ministry of Ports, Shipping and Waterways) मुंबईत वॉटर टॅक्सी (Water Taxi) आणि रोपॅक्स फेरी सेवा (ROPAXferry Services) सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुंबईच्या शहरी जलवाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी, मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई बंदराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी आणि अन्य भागधारक या बैठकीस उपस्थित होते. मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांवरील वाहतुकीची रहदारी कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्थेस चालना देण्यासाठी, रोपॅक्स फेरी सेवेचे 4 नवीन मार्ग डिसेंबर 2021 पर्यंत आणि वॉटर टॅक्सी सेवेचे 12 नवीन मार्ग मे, 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

मंडाविया म्हणाले की, वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सुरू झाल्यामुळे लोकांना येण्या-जाण्यास बरीच सुविधा मिळेल आणि त्यांचा वेळ तसेच खर्चही वाचणार आहे. सध्या रोपॅक्स सेवा भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) पर्यंत चालविली जात आहे. याअंतर्गत, 110 कि.मी. रोड ट्रिप जलमार्गाद्वारे 18 कि.मी.पर्यंत कमी करण्यात आली आहे आणि यामुळे प्रवास करणार्‍यांच्या प्रवासाचा वेळ 3-4 तासांवरून अवघ्या एका तासापर्यंत कमी झाली आहे. या फेरी सेवेचे फायदे लक्षात घेता मुंबईतील इतर अनेक मार्गांवर अशाच सेवा सुरू करण्याची योजना आहे. (हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील तब्बल 60 गावांमध्ये 10 दिवसांपासून वीज गायब; जिल्हा परिषदेने बिल न भरल्याने ग्रामस्थांसमोर अनेक अडचणी)

यामुळे प्रवाशांना प्रदूषणमुक्त, शांत आणि वेळ वाचविणारा प्रवास करता येणार आहे.  प्रवास करता येईल आणि त्यांचा प्रवासाचा वेळ व खर्च वाचू शकेल आणि कार्बनचा ठसा देखील कमी होईल. यामुळे मुंबई शहरातील प्रत्येक भागात मोठ्या संख्येने पर्यटक आणि दररोज प्रवास करण्याची सोय होईल.