महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळात देखील शोककळा पसरवणारी एक धक्कादायक बातमी आज ऐकायला मिळाली. काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाची बातमीने त्यांच्या कुटूंबासह त्यांच्या समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आज पहाटे 5 वाजता त्यांचे निधन झाले. कोरोनावर मात करत असतानाच सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूचा (Cytomegalovirus) संसर्ग झाला होता. नावाप्रमाणेच हा विषाणू खूप वेगळा असून त्याची लक्षणेही वेगळी आहे.
सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?
सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये 40 वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.हेदेखील वाचा- Rajiv Satav Passed Away: राजीव सातव यांच्या निधनानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक
रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोका
ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.
सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?
सायटोमॅजिलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणंही दिसून येतात. बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.
सायटोमॅजिलोची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. हे सर्वसाधारण दुखणं आहे असे समजून अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.