Rajiv Satav Passed Away: राजीव सातव यांच्या निधनानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक
Rajiv Satav Passed Away (Photo Credits: Twitter)

काँग्रेस खासदार (Congress MP) राजीव सातव (Rajiv Satav) यांचे आज पहाटे निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालवत होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 10.30 वाजता हिंगोलीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सातव यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), संजय राऊत (Sanjay Raut), अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे. (काँग्रेस खासदार Rajiv Satav यांच्या निधनानंतर Rahul Gandhi झाले भावूक; सोशल मीडियावर 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली)

शरद पवार:

अजित पवार:

संजय राऊत:

पृथ्वीराज चव्हाण:

अशोक चव्हाण:

सुप्रिया सुळे:

22 एप्रिल 2021 रोजी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.