Sangli: सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. प्रामुख्याने सांगली (Sangli) जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षे पिकांचे मोठे नुकसान झाले. सांगली-मिरजसह इतरही अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. पाठिमागील दोन दिवसांपासून शहरामध्ये कडक उन आणि उकाडा यांमुळे नागरीक हैराण झाले होते. उन्हाच्या काहीलीतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतीचे मात्र मोठेच नुकसान झाले.

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी पाठिमागील आठवडाभरापासून पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही त्रेधातीरपीट उडते. सांगली हा हळद आणि द्राक्ष उद्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक शेतकरी द्राक्षांची थेट निर्यात करतात. तर काही शेतकरी द्राक्षे सुखवून त्यापासून मनुके (बेदाणे) उत्पादन करतात. अशा प्रकारे अचानक पाऊस आला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. (हेही वाचा, Maharashtra Weather: सांगली जिल्हयात मुसळधार पाऊस, गारांचा वर्षाव, द्राक्ष बागायतदार चिंतेत; इतर ठिकाणीही पर्जन्यवृष्टी)

कोकणातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे आंबा पिकांचे मोठेच नुकसान होत असल्याचे पुढे येत आहे. हवामान विभागानेही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.