Supreme Court: महिला पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये राहीली असेल तर तिच्याकडून होणारा वारंवार बलात्काराचा आरोप गृहीत धरता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
Supreme Court | (Photo Credit: ANI)

एखादी महिला स्वमर्जीने पुरुषासोबत राहात (Relationship) असेल आणि त्याच्यासोबतच पुढेही संबंध ठेऊ इच्छित असेल तर मात्र सध्या तिचे त्याच्यासोबतचे संबंध चागले नसतील. तर, अशा प्रकरणात सदर महिलेला संबंधित पुरुषावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (2) (एन) अन्वये एफआयआर अधिकार प्राप्त होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका प्रकरणात हा निर्णय दिला. पुरुषाने लग्नाचे वचन दिले परंतू ते पूर्ण केले नाही या प्रकरणात महिलेने पुरुषाविरोधात तक्रार दिली होती. हे प्रकरणात न्यायालयाने पुरुषाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. उल्लेखनीय असे की सदर पुरुषाकडून संबंधित महिलेला दोन वर्षांचे एक अपत्यही आहे.

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, तक्रारदार महिला ही पुरुषासोबत स्वेच्छेने राहात आहे आणि तिचे त्याच्यासोबत संबंध चांगले होते. त्यामुळे विद्यमान स्थितीत ते संबंध चांगले नसतील तर भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (एन), 377 आणि 506 अन्वये गुन्ह्याबाबत एफआयआर दाखल करता येणार नाही. (हेही वाचा, Supreme Court: वडिलांची संपत्ती वारसाहक्काने मिळविण्याचा मुलीला हक्क; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने राजस्थान हायकोर्टाने एक मे रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. ही याचिका भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (एन), 377 आणि 506 अन्वये दाखल गुन्हात याचिकाकर्त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्या विरोधात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, याच प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले होते की, याचिकाकर्त्याने तक्रारदारासोबत लग्न करणयाचे वचन दिले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराशी संबंध ठेवले. त्यांच्या संबंधामुळे त्यांना एक अपत्य (मुलगी) जन्माला आली. त्यामुळे हा एक गंभीर गुन्हा आहे. तो पाहता न्यायालयाने तक्रारदाराची मागणी ग्राह्य आहे. त्यामुळे आरपीला अटकपूर्व जामीन नाकारण्यात येत आहे.

न्यायाधीश गुप्ता आणि न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने म्हटले की, तक्रारकर्त्याने हे मान्य केले आहे की, ती याचिकाकर्त्यासोबत चार वर्षे संबंधांमध्ये होती. याशिवाय हेही लक्षात आले आहेकी, तक्रारकर्त्याच्या वकीला द्वारे हेही मन्य करण्यात आले आहे की, जेव्हा हे संबंध सुरु झाले तेव्हा तक्रारकर्ती 21 वर्षांची होती.