Supreme Court: वडिलांची संपत्ती वारसाहक्काने मिळविण्याचा मुलीला हक्क; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Supreme Court (Photo Credit - Twitter)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार मुलगा नसलेल्या किंवा असलेल्या कोणत्याही पुरुषाच्या मुलीस तिच्या वडीलांच्या स्वकमाईतील आणि वडिलोपार्जीत संपत्ती मिळिण्याचा हक्क आहे. संबंधित पुरुषाच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यापेक्षा अधिक हक्कदार ही त्याची मुलगीच असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका खटल्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. हा खटला हिंदू वारसाहक्क कायद्यातील महिला आणि विधवांच्या संपत्ती अधिकारांबाबत होता.

न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने म्हटले की, कोणत्याही हिंदु पुरुषाच्या हायातीत किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपत्तीचे वाटप वारसाहक्काने होताना त्या संपत्तीची त्याची मुलगी हक्कदार राहते. ही संपत्ती मग त्या पुरुषाची स्वकमाईची असो किंवा त्याला वारसाहक्काने मिळालेली. खंडपीठाने म्हटले की, जीवंत अथवा मृत हिंदु पुरुषाच्या इतर वारसांप्रमाणे (जसे की, त्याची स्वत:ची मुले अथवा भावाची मुले) त्याची मुलगीही वाहस असेल. (हेही वाचा, सासरच्या मंडळींनी हाकलल्यास, महिला कुठूनही दाखल करू शकते खटला: सर्वोच्च न्यायालय)

खंडपीठाने वारसाहक्क अथवा उत्तराधीकाऱ्याच्या अनुपस्थितीत मुलला आपल्या वडीलांच्या स्वकामाई आणि वारसाहक्काच्या संपत्तीत अधिकार असल्याचे ठासून सांगिले न्यायमूर्ती मुरारी यांच्या खंडपीठाने 51 पानांचा निर्णय दिला. या निर्णयामुळे देशभरातील तमाम महिला, मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळाला आहे.