अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच राजकीय नेते विविध ठिकाणी दौऱ्यावर जाऊन तेथील जनतेला आपल्या बाजूने मतं उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) पक्षावर हल्लाबोल केला आहे.

सध्या मोदी सरकार (Modi Sarkar) यांच्य काळात अधिकारी दबावाखाली काम करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. यापूर्वीचे अधिकारी मनमोकळेपणाने काम करत होते असे म्हणत हल्लाबोल केला आहे. तर उच्च शिक्षित तरुण तरुणींना चहा आणि पकोडे तळून उदारनिर्वाह करण्याची वेळ युती सरकारने आणली आहे. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे दिसून आले आहे. मोदी सरकारने जनतेला आश्वासने दिली खरी पण ती सत्यात उतरवली नसल्याचे ही अजित पवार यांनी म्हटले आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने अघाडीचा निर्णय 48 पैकी 44 जागांवर झाला आहे. तर राहिलेल्या चार जागांसाठीचा निर्णय चर्चा झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.त्याचसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्या समविचारी पक्षाला सोबत घेण्यात येईल असा विचार सुरु आहे.

अजित पवारांनी उज्जल निकम (Ujjwal Nikam) यांना निवडणूक लढवण्याबबात विचारले आहे. परंतु निकम यांच्याकडून अद्याप होकार आला नाही आहे. त्यामुळे समाजातील नवाजलेल्या व्यक्तींना येत्या निवडणुकीत सहभागी करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.