#5YearChallenge : मोदी सरकारकडून 5 वर्षांत केल्या गेलेल्या कामांची जाहिरातबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI)

#5YearChallenge : सध्या सोशल मिडियावर मोठ्या तेजीत #10YearChallenge चालू आहे. आपले 2009 आणि 2019 मधील असे दोन फोटो टाकून 10 वर्षांत झालेला बदल दाखवणे हे चॅलेंज होते. यात सामान्य लोकांसह अनेक सेलिब्रिटीदेखील सामील झाले. मात्र त्यानंतर त्याला सामाजिक स्वरूप आले. लोकांनी समाजात 10 वर्षांत घडलेले अथवा न घडलेले बदल दाखवायला सुरुवात केली. शेवटी जनतेची गाडी घसरली ती राजकारणावर. राजकारणी लोकांनी दिलेली वाचणे पाळली नाहीत, त्यामुळे दहा वर्षांत काहीच बदल घडला नाही अशा आशयाचे फोटोज सोशल मिडियावर फिरू लागले. हीच ती वेळ आणि हीच ती संधी असे समजून, भाजपा (BJP)ने आपण केलेल्या चांगला कामाचा आढावा #5YearChallenge द्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पाच वर्षात काय चांगले केले याची ही यादी आहे.

भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून अनेक फोटो शेअर करण्यात आले असून, यामध्ये सन 2013 साल आणि 2019 सालाची तुलना करण्यात आली आहे.

स्वच्छ गंगा – तब्बल 128 वर्षानंतर पहिल्यांदा मोदी सरकारच्या काळात गंगा स्वच्छ झाली.

काशी घाट – नरेंद्र मोदींनी या पाच वर्षांमध्ये वाराणसीचे संपूर्ण रूप पालटले.

शौचालये – स्वच्छ  भारत अभियान अंतर्गत, महिलांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्ती मिळाली.

आवास योजना – प्रधानमंत्री आवास योजनेतून लोकांना घरे मिळाली.

घोटाळे – 2013 आधी यूपए (UPA) सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. मात्र मोदी सरकारने जनतेचा फक्त विकास केला.

व्याजदर – घरांवरील व्याज दर उतरले

यांसारखी अनेक उदाहरणे याद्वारे देण्यात आली आहेत, पहा यादी

यावर्षी लोकसभा निवडणूक येऊ घातल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींत कॉंग्रेसची झालेली सरशी, उत्तरप्रदेशमध्ये बसपा आणि सपा यांची झालेली युती अशा घटना पाहता मोदी सरकार जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी चांगलीच प्रचाराला लागले आहे हे दिसून येते.