student प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Registration for Form 17 :   महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आता आगामी जुलै-ऑगस्ट 2025 च्या एसएससी आणि एचएससी परीक्षांसाठी प्रायव्हेट कॅन्डिटेड म्हणून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या उपक्रमाचा उद्देश फेब्रुवारी-मार्च 2025 च्या बोर्ड सत्रासाठी नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेणे आहे, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचण्यास मदत होईल.

अधिकृत निवेदनात, बोर्डाने स्पष्ट केले की खाजगी उमेदवारांना पारंपारिकपणे फक्त मार्च सत्रासाठी नोंदणी करण्याची परवानगी आहे. पण अनेक पात्र विद्यार्थी अंतिम मुदत चुकवतात, ज्यामुळे त्यांना त्या वर्षी परीक्षेला बसता येत नाही. यावर उपाय म्हणून, बोर्ड प्रथमच जुलै-ऑगस्ट सत्रासाठी थेट खाजगी उमेदवारांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे.

ऑनलाइन नोंदणीचं वेळापत्रक

ऑनलाइन नोंदणी विंडो 15 एप्रिल 2025 पासून खुली होईल. विद्यार्थी 15 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - mahahsscboard.in वर फॉर्म नंबर 17 भरावा. एकदा पूर्ण झाल्यावर, अर्जदारांना भरलेला फॉर्म आणि ऑनलाइन शुल्क पावती प्रिंट करावी लागेल आणि मूळ कागदपत्रांसह ते त्यांच्या अर्जात दिलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात सादर करावे लागतील. Maharashtra HSC Result 2025: इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन कसा तपासाल? घ्या जाणून .

महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळातून इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील एसएससी (इयत्ता १० वी) परीक्षेसाठी खाजगी उमेदवार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहेत. नोंदणी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना डिजिटल नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, त्यानंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरून आवश्यक पैसे भरावे लागतील.