Pune Municipal Corporation Jobs News: पुणे महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आणखी विस्तारण्यास मदत केली आहे. पुणे महापालिका कार्यालयाची सुरक्षा आता तृथीयपंथी म्हणजेच ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हातात असणार आहे. पुणे महापालिकेने शहराच्या इतिहासात ट्रान्सजेंडर (Transgender in PMC) समूहातील उमेदवारास सुरक्षारक्षक म्हणून नेमण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. पुणे महापालिकेने एकूण 25 ट्रान्सजेंडर्स व्यक्तींना सुरक्षारक्षक म्हणून नेमले आहे. त्यापैकी 10 सुरक्षारक्षकांना पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रकही देण्यात आले आहे. आयुक्त विक्रम कुमार काल शहरात नसल्याने या 15 जणांना नियुक्तीपत्र मिळू शकले नाही. मात्र, उर्वरीतांना लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
नियुक्तीपत्र मिळालेल्या 10 सुरक्षा रक्षकांपैकी पाच जणांना पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना पालिकेच्या शहरातील विविध कार्यालयांमध्ये नेमण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर्स म्हणजे समाजातील एक दुर्लक्षीत घटक. वेगवेगळ्या समाजात प्रदेशानुरुप त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. काही ठिकाणी तृथीयपंथी, काही ठिकाणी हिजडा, काही ठिकाणी छक्का कधी किन्नर असे नानाविध नावे देऊन समाज त्यांची हेटाळणी करतो. परिणामी या समूहातील व्यक्तींना सामाजिकदृष्ट्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यातून तृतीयपंथीयांबद्दल असलेला गैरसमज अधिकच पसरत जातो. मात्र, शासन आणि प्रशासानाने योग्य निर्णय घेत त्यांना जर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला, तर मोठे परीवर्तन घडू शकते, अशी भावना हे तृथीयपंथी व्यक्त करतात. (हेही वाचा, Transgender Salon in Mumbai: मुंबईत सुरु झाले पहिले ट्रान्सजेंडर सलून; नाव आहे Transformation, जाणून घ्या खासीयत)
ट्रान्सजेंडर हा एक संकल्पनावाचक शब्द आहे. ज्याचा वापर ज्यां लोकांची लिंग ओळख त्यांना जन्मावेळी नियुक्त केलेल्या लिंगापेक्षा वेगळी असते, अशा व्यक्तींचे वर्णन करण्यासाठी केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा शब्द अशा लोकांचा संदर्भ देते. जे त्यांच्या जैविक लिंगाशी संबंधित असलेल्या लिंगापेक्षा वेगळे लिंग ओळखतात. ट्रान्सजेंडर व्यक्ती इतिहासात आणि प्रत्येक संस्कृतींमध्ये प्रत्येक टप्प्यावर अस्तित्त्वात असल्याचे दिसून येते. अनेक समाजांमध्ये लैंगिक विविधतेच्या वेगवेगळ्या संज्ञा आणि समज आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्व-ओळखलेल्या लिंगाचा आदर करणे आणि ते मान्य करणे आणि त्यांना प्राधान्य देणारे योग्य सर्वनाम आणि संज्ञा वापरणे महत्वाचे आहे.