दिल्ली येथे जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारच्या रात्री हिंदू रक्षक दलाचे कार्यकर्ते पिंकी चौधरी यांनी हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. चौधरी यांनी जाहीर करण्यात आलेल्या व्हिडिओत जेएनयू मधील हल्ला हा आम्हीच केला अशी कबुली देण्यात आली आहे. जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन आम्ही खपवून घेणार नाही. हे विद्यार्थी आपल्याच देशात खातात, शिकतात. आणि देशाविरुद्धच काम करतात यापुढे जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला अशीच कारवाई सहन करावी लागेल असा इशारा सुद्धा चौधरी यांनी दिला आहे. त्यानंतर या हल्ल्याच्या विरोधात संतापाची लाट देशभरातून उमटत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा जेएनयु येथे हल्लाचा विरोध करण्यात आला असून पुणे येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ABVP कार्यालयाच्या बोर्डाला काळे फासले आहे.
जेएनयुच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या गोष्टीमुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून सोमवारी भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्याचसोबत नाशिक येथे सुद्धा हल्ल्याचा विरोध केला. त्यानंतर पुन्हा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात धाव घेत त्यांच्या बोर्डाला काळे फासले. तसेच भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रवादी या दोन गटात राडा सुद्धा झाला. रविवारी रात्री जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे.(JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी)
दरम्यान आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुरू असलेले आंदोलन मुंबई पोलिसांनी आझाद मैदानामध्ये स्थलांतरित करण्यात आले. या प्रकरणी पोलीस उपायुक्त (झोन-1) संग्रामसिंह निशाणदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराची जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, असं आवाहनदेखील करण्यात आले.