JCB Attack On Ox (Photo Credits: YouTube)

पिसाळलेल्या बैलास जेसीबी बकेटखाली (JCB Bucket) दाबुन मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून जोरदार व्हायरल तसेच बातम्यांचा विषय ठरला होता. हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रातील शेतकरी आणि प्राणिमित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. बैलाला अशा प्रकारे ठार मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. त्यात दिसणारे लोक कोण आहेत याचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. अखेर पोलिसांनी या व्हिडिओचा माग काढत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बैलाला जेसीबी बकेटच्या सहाल्याने ठार मारल्याचा हा व्हिडिओ पुणे (Pune District) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur Taluka) तालुक्यात अलेल्या पोंदवडी (Pondwadi Village येथील आहे. या प्रकरणी तपास करत पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. गोटया ऊर्फ रोहीत शिवाजी आटोळे (रा . पोंदवडी ता . इंदापूर जि . पुणे) भाऊसाहेब आण्णा खारतोडे (रा . पोंदवडी ता . इंदापूर जि . पुणे) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांवर भारतीय दंड संहिता कलम 429 , 505 ( 1 ) ( ब ) प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 सुधारणा 1982 चे कलम 11 (1) ( ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, पिसाळलेल्या बैलाला आवरण्यासाठी जेसीबी ने चिरडून केली या मुक्या जनावराची क्रूर हत्या, व्हिडिओ पाहून तुमचाही राग होईल अनावर (Watch Video))

बैलाला ठार मारल्याचा व्हिडिओ आजचा नसून तो ऐन दिवळीत म्हणजेच २७ आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली आहे. ही घटना इंदापूर तालुका हद्दीत असलेल्या पोंदवाडी गावातील आबा थोरात या रहिशाच्या घरामागील शेतात घडली. ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. 2 मनिटे 41 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता.  संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, जेसीबीचा वापर करुन ठार मारण्यात आलेला बैल पिसाळला होता. त्यामुळे तो लोकांच्या अंगावर धाऊन जात होता. तो दुचाकी, चारचाकी वाहनांमगे पळत असे. बैलाच्या आक्रमकतेमुळे आजूबाजूचे नागरिक, पाळीव प्राणी, बालके आणि इमारती, शेती, झाडं आदींनाही धोका होता. त्यामुळे बैलाच्या वर्तनाबाबत सर्वजनज घाबरुन गेले होते, असे सांगण्यात येत आहे.