मुक्या जनावरांवर आजही अनेक ठिकाणी अत्याचार होताना दिसतात. मुक्या जनावरांपैकी एक असा जनावर जो शेतात बळीराजासोबत रात्रंदिवस राबतो आणि त्याच्या या कष्टाचे फळ आपल्याला अन्नधान्याच्या रुपात मिळते. मात्र बैलाच्या जीवावर उठलेल्या एका जेसीबीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून क्रूरतेचा कळस गाठत आहे. न्यूज18 लोकमतने दिलेल्या या व्हिडिओमध्ये पिसाळलेल्या बैलाला आवरण्यासाठी यावर चक्क जेसीबी चालविला असून त्याची क्रूरपणे हत्या केली आहे. या क्रूरपणाचा सर्व स्तरातून विरोध होत असून राजकीय नेत्यांनी या जेसीबी चालविणा-याला त्वरित अटक करा असे म्हटले आहे.
हा व्हिडिओ पश्चिम महाराष्ट्रातला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात हा बैल पिसाळलेला असून त्याला आवर घालण्यासाठी जेसीबीने केलेली कारवाई खरंच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हेदेखील वाचा- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, रब्बी पिकांच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ
या व्हिडिओचा सर्व स्तरातून कडाडून विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे क्रूर कृत्य करणा-याला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. शेतकरी देखील हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत आहे, असे क्रूर कृत्य करणारा आम्हाला सापडला आम्ही त्याच्यावर तीच जेसीबी टाकू.
बळीराजाला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जपणा-या बैलाला मारणा-याला आम्ही जागीच ठेचू असे अनेक शेतकरी सांगत आहे.