डेटिंग अॅपच्या (Dating App) माध्यमातून फसवणुकीचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. 2019 मध्ये पुण्यात डेटिंग अॅपद्वारे 105 जणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे (Cyber Crime Police) आल्या होत्या. तर मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात 86 तक्रारी आल्या आहेत. डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री करुन धमकावणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. फसणवणूक करणाऱ्या टोळ्या या प्रामुख्याने दिल्ली. उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता येथील असल्याचे दिसून आले आहे. (Pune: डेटिंग अॅपवर कॉस्मेटिक सर्जन अशी ओळख दाखवून महिलेला घातला तब्बल 12 लाखांचा गंडा)
अलिकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा अॅप्स आणि टिंडर, स्पॅनचॅट, स्नॅक अशा ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र याद्वारे मैत्री करताना सावधगिरी न बाळगल्याने फसवणूकीचे प्रकार घडतात. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा डेटिंग अॅपवर आपली खासगी, कौटुंबिक माहिती कोणालाही शेअर करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. (Pune: डेटिंग अॅपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरूणाला पडले महागात; नेमके काय घडले? वाचा सविस्तर)
दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात बराच मोकळा वेळ मिळाल्याने तरुणाई सोशल मीडिया, डेटिंग अॅप्सवर अधिक रमली आणि त्यातून फसणूकीच्या तक्रारी समोर आल्या. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास दाखवल्याने फसवणुकीचे प्रकार घडतात. हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच डेटिंग अॅप किंवा सोशल मीडियाचा वापर करतात पुढील खबरदारी घेणे गरजेचे आहे- ऑनलाईन अॅपद्वारे अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नका, डेटिंग अॅपचा वापर सावधगिरीने करा, सोशल मीडियावर खासगी माहिती शेअर करू नका. त्याचबरोबर खासगी फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे कोणालाही पाठवू नका. ऑनलाइन व्हेरिफाइड अॅपशिवाय इतर ठिकाणी माहिती शेअर करू नका.