
डेटिंग अॅपवरून (Dating Apps) महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला महागात पडले आहे. या अॅपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेने संबंधित तरूणाला भेटायला बोलवले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडून दीड लाखांचा ऐवज लुटला आहे. पुण्यातील (Pune) वाकड (Wakad) परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तरूणाने महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) तक्रार दाखल दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
आशिष कुमार (वय, 3o) वर्षीय तरूणाचे नाव असून तो चेन्नईमधील रहिवाशी आहे. आशिष कुमारची गेल्या काही दिवसांपूर्वी डेटिंग अॅपवर एका महिलेशी ओळख झाली होती. दोघे जण एकमेकांशी दररोज चॅटिंग करत होते. कामाची गरज असल्याचे सांगत महिलेने त्याला पुण्याला बोलावून घेतले. दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये खोली घेतली. मात्र, तेथे गेल्यानंतर महिलेने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल फोन असा एकूण दीड लाखांचा ऐवज लुटून फरार झाली. शुद्धीत आल्यानंतर तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात जाऊन हा सर्वप्रकार सांगितला. त्यानुसार आरोपी महिलेच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर या महिलेचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Accident: लग्नासाठी जात असताना रस्त्यातच गाडीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी
दरम्यान, फिर्यादीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल फोन आणि 15 हजार असे एकूण दीड लाखांचा ऐवज चोरी करून नेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.