Accident: लग्नासाठी जात असताना रस्त्यातच गाडीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी
Accident Representational image (PC - PTI)

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) आज (23 जानेवारी) भीषण अपघात (Car Accident) घडल्याची घटना उघसकीस आली आहे. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच गाडीचा टायर फुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक इको गाडी मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जात होती. मात्र, डहाणूतील धानीवरी येथे या गाडीचा टायर फुटला. ज्यामुळे अपघात घडला. या अपघातात एका चिमुकल्यासह त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तर, 6 अन्य सहाजण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे देखील वाचा- Thane Fire: ठाणे शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला आग

यापूर्वी आज सकाळी नंदुरबार जिल्ह्यात मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना धडगाव तालुक्यातील तोरणमाळ घाटातील खडकी पॉईंटजवळ आज घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमीं झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.