PDCC Bank: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जुन्या नोटांमुळे गोत्यात, RBI कडून 22 कोटी 25 लाख रुपयांच्या 'त्या' नोटा स्वीकारण्या नकार
Rs 500 and 1,000 Old Notes | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

नोटबंदी (Demonetization) संपून आता बराच काळ उलठून गेला असला तरी नोटबंदीचे ओझे सर्वसामान्य जनतेसह काही बँकाही वाहात असल्याचे पुढे आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (Pune District Central Cooperative Bank) अशा बँकांपैकीच एक आहे. नोटबंदी काळात जमा झालेल्या एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटांच्या रुपात तब्बल 22 कोटी 25 लाख रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (PDCC Bank) पडून आहेत. या नोटा स्वीकारण्यास आरबीआयने (RBI) स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे बँकेने सध्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परिणामी न्यायालयाचा निकाल येई पर्यंत बँकेला आता नोटांचे हे ओझे नोटांच्या रुपात सांभाळावे लागत आहे. यातून बँकेलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याची चर्चा आहे.

आरबीआयने जर या नोटा स्वीकारल्या नाहीत तर त्याचे पुढे काय होणार? तसेच, त्यामुळे बँक आणि पर्यायाने ग्राहकाल बसणारा भुर्दंड कोण सहन करणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बाँकेकडे नोटबंदी काळात आणि त्या आधीच्या काही काळात जमा झालेल्या तब्बल 22 कोटी 25 लाख रुपये किमतीच्या जुन्या नोटा आहेत.

सर्व बँकांची बँक अर्थाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय. या बँकेकडे या नोटा जमा करण्याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने संपर्क केला असता, या नोटा स्वीकारण्यास बँकेने नकार दिला. सुरुवातीला बँकेकडे सुमारे 576 कोटी रुपये किमतीच्या नोटा होत्या. या नोटा जवळपास 7 महिने बँकेकडे पडून होत्या. त्यापैकी एकूण 554 कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयने बदलून दिल्या. या काळात बँकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. आताही बँकेकडे एकूण जमा नोटांपैकी आरबीआयने स्वीकारुन शिल्लख राहिलेल्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या तशाच धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळे या नोटांचे पुढे होणार काय? याबाबत उत्सुकता कायम आहे. (हेही वाचा, Urban Cooperative Banks: आमदार, खासदार, नगरसेवकांसह राजकीय नेत्यांना RBI चा धक्का, सहकारी बँक संचालकपदासाठी Degree in Economics बंधनकारक)

आरबीआयकडून जुन्या नोटा बदलून मिळाव्या यासाठी पीडीसीसी बँकेने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालावरच आता या नोटांचे भवितव्य ठरणार आहे. तोवर बँकेचे भांडवल बिनकामी अडकल्याने त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता निर्माण झाला आहे. जुन्या नोटांमध्ये भांडवल अडकल्याने बँकेला सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची आर्थिक झळ कारणाशिवाय सहन करावी लागत असल्याचे समजते.