Drugs Case in Mumbai: माहीम भागात Mephedrone चा मोठा साठा जप्त; NCB कडून 3 ड्रग्स तस्कर अटकेत
एनसीबी (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये एनसीबीचं धाडसत्र सुरू झाल्यानंतर अनेक लहान-मोठी नावं ड्रग्स केस मध्ये समोर आली. यामध्ये काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील डोंग़री भागातील ड्रग्सच्या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर काल रात्री माहिम परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात MD (Mephedrone)चा साठा आढळला आहे. कमर्शिअल क्वान्टीटी मध्ये हे ड्रग्स आढळल्याने एनसीबीने ते ताब्यात घेत पुढील तपास सुरू ठेवला आहे. या ठिकाणी एनसीबीने 3 जणांना अटक देखील केली आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये 1 कोटी रक्कमेच्या mephedrone सह ड्रग्स तस्कर पोलिसांच्या ताब्यात.

एनसीबीने 20 जानेवारीला चिंकू पठाण ला अटक केली होती. तो कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्यांच्या संपर्कातील एक आहे. या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान चिंकू पठाणला अटक झाल्यानंतर त्याची प्रकृती ढासळल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.

ANI Tweet

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर मुंबई मधील अनेक ड्रग्स तस्कर सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं देखील यावेळेस चर्चेमध्ये आली होती. त्यापैकी काहींना एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी देखील बोलावण्यात आले होते.