मुंबई मध्ये NCB ची मोठी कारवाई; डोंगरी भागात Chinku Pathan च्या ड्रग कारखान्यावर छापा
Represerntational Image (Photo credits: stevepb/Pixabay)

मुंबई मध्ये सध्या ड्रग्स रॅकेट प्रकरणी अनेकजण एनसीबीच्या (Narcotics Control Bureau) रडारवर आहेत. आजच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने आज दक्षिण मुंबईतील डोंगरी ( Dongri) भागामध्ये एका ड्रग्स कारखान्यावर छापा टाकला आहे. दरम्यान या छापेमारीमध्ये हत्यारं, ड्रग्सचा साठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्सद्वारा समोर आली आहे. हा कारखाना कुख्यात चिंकू पठाणचा (Chinku Pathan) आहे. दरम्यान चिंकू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. तसेच तो हा गँगस्टर करीम लालाचा (Karim lala) नातेवाईक, हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

चिंकू पठाणला काल नवी मुंबईच्या घणसोली भागातून एनसीबीने ताब्यात घेतले आहे. आज त्याच्या कारखान्यात कोट्यावधींची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान ही एनसीबीची आतापर्यंतची महत्त्वाची आणि मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याच्या अटकेनंतर आता कोणकोणती मोठी नावं समोर येणार? याची उत्सुकता आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये 1 कोटी रक्कमेच्या mephedrone सह ड्रग्स तस्कर पोलिसांच्या ताब्यात.

ANI Tweet

दरम्यान सध्या महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान ते बॉलिवूड मधील अनेक बडे कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. अनेकांची एनसीबीकडून कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी मुंबईमधील प्रसिद्ध मुच्छड पानवाला याचं देखील नाव समोर आलं होतं. त्याला अटक देखील झाली होती. नंतर जामीनावर त्याची सुटका झाली आहे.