मुंबई अॅन्टी नार्कोटिक्स सेलकडून आज (20 जानेवारी) एका ड्रग पेडलर्स ला अटक केली आहे. दरम्यान mephedrone तस्कर प्रकरणी अटक झाली असून 1.10 कोटींचा माल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. ताडदेव भागातून एका 44 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नार्कोटिक्स सेल (Mumbai Anti-Narcotics Cell) कडून सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या व्यक्तीकडे एक बॅग होती. पोलिसांनी ती बॅगही जप्त केली आहे. दरम्यान या बॅगेतच mephedrone हे बंदी असलेले synthetic stimulant आढळले आहे. ही व्यक्ती मुंबईच्या जेजे मार्ग येथे राहणारी होती. तर मागील काही वर्षांपासून ती व्यक्ती ड्रग्सचा पुरवठा करत होती. Drugs Case: कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान ला ड्रग्ज प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
Mumbai Anti-Narcotics Cell has arrested a 44-year-old drug peddler, seized over 1 kg Mephedrone drug worth more than Rs 1 crore pic.twitter.com/nxN8q0U2gW
— ANI (@ANI) January 20, 2021
सध्या मुंबई पोलिसांकडून ही व्यक्ती नेमकी mephedrone कुठून मिळवत होती याचा शोध घेत आहे. त्याप्रमाणेच या व्यक्तीसोबत इतर कोणी साथीदार होते का? याचा देखील तपास सुरू आहे. Narcotic Drugs and Psychotropic Substances अॅक्ट अंतर्गत अटक केलेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे.
मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणी मोठी कारवाई सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर यामधील बॉलिवूड कनेक्शन देखील समोर आले आहे. अनेक बडे कलाकार NBC च्या रडार वर आहेत. सध्या महाविकास आघाडी मधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान देखील अटकेत आहे.