Drugs Case: मुंबईतील एस्प्लानेड कोर्टाने (Esplanade Court) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) ला ड्रग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज समीर खान यांची न्यायालयात हजर होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. समीर खानला ड्रग्स प्रकरणात 13 जानेवारी रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्याचा एनसीबी रिमांड आज संपेला होता.
दरम्यान, मुंबईतील 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. गूगल पे च्या माध्यमातून करण सजनानी आणि समीर खान यांच्यात 20,000 रुपयांचा व्यवहार झाला. एनसीबीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा व्यवहार ड्रग्ससंदर्भात झाला असावा. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनसीबीने समीर खान यापूर्वी समन्स बजावलं होतं. (वाचा - Drugs Case In Mumbai: जावई Sameer Khan च्या अटकेनंतर Nawab Malik यांची पहिली प्रतिक्रिया)
#UPDATE: Esplanade Court in Mumbai sends Sameer Khan, the son-in-law of Maharashtra Minister Nawab Malik to 14-day judicial custody in connection with a drugs case. https://t.co/KmBXFCcspR
— ANI (@ANI) January 18, 2021
एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कुरिअरमध्ये गांजा ताब्यात घेतला होता. त्यानंतर खार येथील करण सजनानी यांच्या घरातून देखील गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर करण सजनानी, राहिल फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या अधिक तपासात वांद्रे येथील रहिवासी आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानचे नाव पुढे आले. त्यानंतर समीर खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते.