Nawab Malik (Photo Credits: Twitter)

एनसीपी नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik‌) यांचा जावई समीर खानला (Sameer Khan) काल एनसीबीने ताब्यात घेतले आहे. ड्रग्स केस प्रकरणी त्याची चौकशी सुरू असून आज त्याला न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहे पण या अटकेनंतर नवाब मलिक यांनी ट्वीट करत आपली सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्याच्या अंमलबजावणीसमोर कोणताही भेदभाव नाही. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,' असं नवाब मलिक यांनी ट्वीट करत म्हटले आहे. Sameer Khan Arrested by NCB: ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना अटक; मंत्री नवाब मलिक यांचे आहेत जावई.

ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी आणि त्याच्याशी 20,000 रुपयांचा ऑनलाईन व्यवहार उघडकीस आल्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावला होता. त्यानंतर त्यांच्या घरी छापा देखील टाकण्यात आला होता. काल रात्री समीर खानला अटक झाली आहे. रात्रभर एनसीबीची मुंबई मध्ये धाडी टाकण्याचं काम सुरू होतं. दरम्यान नवाब मलिक हे महाराष्ट्रात महा विकास आघाडी मधील अल्पसंख्यांक व्यवहार व कौशल्य विकास मंत्री आहेत.

नवाब मलिक ट्वीट

मुंबईचा प्रसिद्ध 'मुच्छड़ पानवाला' याला देखील अटकेनंतर काल जमीन मिळाला आहे. बुधवारी (13 जानेवारी) मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड़ पानवाला याला 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.