Sameer Khan Arrested by NCB: ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना अटक; मंत्री नवाब मलिक यांचे आहेत जावई
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

सध्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज प्रकरणात चौकशी करत आहे. या प्रकरणात याआधी एनसीबीकडून अनेक लोकांची चौकशी झाली आहे. गरज पडल्यास हाय प्रोफाइल व्यक्तींनाही निवेदनासाठी बोलावले जात आहे. आता महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक व्यवहार व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना एनसीबीने अटक केली आहे. यापूर्वी खान यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास खान दक्षिण मुंबईतील बल्लार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयात प्रवेश करताना दिसले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी आणि त्याच्याशी 20,000 रुपयांचा ऑनलाईन व्यवहार उघडकीस आल्यानंतर एजन्सीने खान यांना समन्स बजावला होता. मुंबईत 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज अटक केली. समीर खानचे लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफरशी झाले आहे. (हेही वाचा: Drug Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुच्छड पानवालाचे मालक रामकुमार तिवारी याला मिळाला जामीन)

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यावर पुढील कार्यवाही करत खार येथील करण सजनानी यांच्या घरातून गांजाची एक खेप जप्त करण्यात आली. करण सजनानी, राहिल फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार अटक केली गेली आणि त्यांना न्यायालयात हजर केले. तपासादरम्यान वांद्रे येथील रहिवासी समीर खानचे नाव पुढे आले, त्यानंतर त्याला आज चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

दरम्यान, मुंबईचा प्रसिद्ध लक्षाधीश 'मुच्छड़ पानवाला' याला जमीन मिळाला आहे. बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड़ पानवाला याला 15 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर केला. या आठवड्याच्या सुरुवातीला मादक पदार्थांच्या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुच्छड़ पानवाला उर्फ ​​जयशंकर तिवारी यांना अटक केली होती.