Drug Case: एनसीबीने (NCB) मुंबईतील प्रसिद्ध करोडपती मुच्छड पानवालाचे मालक रामकुमार तिवारी यांना ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यांच्याकडे कथित रुपात ड्रग्जचा साठा आढळून आल्याची माहिती समोर आली होती. रामकुमार तिवारी यांचे दक्षिण मुंबईतील अपकमिंग केम्प्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाला नावाने एक दुकान आहे.(NCB Arrested Mucchad Paanwala: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांना अटक)
रामकुमार तिवारी याला सोमवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रामकुमार याला अटक केली गेली. खरंतर एनसीबीने एक मोठ्या मारिजुआनाच्या तस्करी करणाऱ्या रॅकेटचा खुलासा केला होता. ज्यामध्ये मुच्छड पानवाला यांचे नाव समोर आले होते. तसेच यामध्ये एक ब्रिटिश नागरिक आणि वांद्रेतील दोन महिलांना सुद्धा अटक केली होती.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने मुंबईतून 200 किलो ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी अभिनेत्री दीया मिर्जा हिची एक्स मॅनेजर राहिला फर्नीचरवाला आणि एक ब्रिटिश नागरिक करन सजनानी याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. या लोकांची चौकशी केल्यानंतर मुच्छड पानवाला याचे नाव समोर आले. चौकशी दरम्यान असे समोर आले की, रामकुमार तिवारी याचा सुद्धा ड्रग्ज प्रकरणात समावेश आहे.(Drugs Case: सुशांत सिंह राजपूत याचा मित्र ऋषिकेश पवार याने पळ काढल्यानंतर NCB कडून शोध सुरु, अभिनेत्याला ड्रग्ज दिल्याचा ठपका)
मुच्छड पानवाला याचा धंदा मुंबईत 1977 पासून सुरु आहे. दक्षिण मुंबईतील आलिशान परिसरात त्याचे दुकान असून बहुतांशजण त्याच्याकडे पान खाण्यासाठी येत असतात. मुच्छड पानवाला याची वेबसाइट सुद्धा आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्या सुद्धा या दुकानातून ऑर्डर देतात. त्याचसोबत मोठमोठ्या इवेंट्स आणि कार्यक्रमांमध्ये मुच्छड पानवाल्याकडून पान मागवले जाते.